भयंकर! पारधी बेड्यावर सात वर्षाच्या चिमूकलीवर सामूहिक अत्याचार

विजयगोपाल। मयूर अवसरे
Saturday, 8 August 2020

पीडीता रडत असल्याने आईली जाग आली. आईने तिला विचारले असता त्या मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. ही घटना सामाजिक संस्था चालविणाऱ्या मंगेशी रमेश मुनला कळल्यानंतर तिने समुपदेशन केले व पुलगांव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची गभीरता लक्षात घेता पोलिस पथकाने वेगाने तपास करण्यास सुरुवात केली.

देवळी (जि. वर्धा)  : देवळी तालुक्यातील इंझाळा गावाच्या जवळ असलेल्या पारधी बेड्यावर ६ ऑगस्टच्या रात्री ११ वाजताच्या दरम्यान वय ७ वर्षांची चिमुकली आईजवळ घराच्या समोर खाटेवर झोपली असताना आरोपी विनोद विठ्ठल वर्भे वय ३५ (रा इजाला) याने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने बालिकेला खाटेवरुन उचलून बाजुच्या नर्सरीत नेले व आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला.

नंतर तिला घरासमोर आणून सोडुन दिले व पळून गेले. पीडीता रडत असल्याने आईली जाग आली. आईने तिला विचारले असता त्या मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. ही घटना सामाजिक संस्था चालविणाऱ्या मंगेशी रमेश मुनला कळल्यानंतर तिने समुपदेशन केले व पुलगांव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची गभीरता लक्षात घेता पोलिस पथकाने वेगाने तपास करण्यास सुरुवात केली.

सविस्तर वाचा - कोरोनामुळे कुटुंबीय झाले क्वारंटाइन; घराला कुलूप पाहून अट्टल चोरांनी साधला डाव

उपविभागीय अधिकारी तृप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र गायकवाड, विवेक बन्सोड, रविंद्र हाडके, अनिल भोरे, मुकेश वादिले पुढील तपास करीत आहेत. पुलगाव पोलिस हद्दीतील इंझाला गावाजवळची ही घटना असुन कलम ३६३, ३६६(अ) ३७६(ड,ब) ३४ भा.द.वि ६, १७अनुसार अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे  

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven-year-old girl tortured