भंडाऱ्यात १७ हजार नागरिक होम क्वारटांइन, एकही कोरोनाचा रुग्ण नाही 

corona
corona

भंडारा : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण नसला तरी जिल्हा प्रशासन डोळ्यात तेल घालून काम करीत आहे. आतापर्यंत 79 व्यक्तींच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ते सर्व नमुने निगेटिव्ह आलेले आहेत. लगतच्या नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने जिल्हा सीमेवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात येताच केंद्रशासनाने 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला. 14 एप्रिलला लॉकडाउनची संपुष्टात येणार आहे. मात्र, राज्यासह देशभरात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. शीघ्र प्रतिसाद पथकाद्वारे भेट देऊन तपासणी केल्याने आजवर जिल्ह्यात 18 हजार 858 व्यक्ती पुणे, मुंबई व इतर राज्यातून आल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 1012 व्यक्तींनी होमक्वारंटाइनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केला. तर 17 हजार 846 व्यक्तींना होमक्वारंटाइन करण्यात आले. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना केल्या असून ज्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा स्टॅम्प लावण्यात आला आहे. 

आतापर्यंत 57 व्यक्तींना हॉस्पिटल क्वारंटाईनमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 9 एप्रिलपर्यंत 79 व्यक्तींचे घशातील नमुने इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय (मेयो) नागपूर येथे पाठविण्यात आले होते. गुरुवारपर्यंत 72 व्यक्तींचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर, उर्वरित सात व्यक्तींचा तपासणी अहवाल आज, शुक्रवारी प्राप्त झाला असून अहवाल निगेटिव्ह आहे. 

परदेशातून एकही व्यक्ती जिल्ह्यात आली नसून 6 व्यक्ती अलगीकरण कक्षात भरती आहेत. तर, 13 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1 मार्च ते 10 एप्रिल दरम्यान मुंबई, पुणे व इतर राज्यातून परत आलेल्या व्यक्तींची संख्या 18 हजार 858 आले आहेत. यापैकी 1,012 व्यक्तींचा 28 दिवसांचा गृह विलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे. 17,846 व्यक्तींना गृह विलगीकरणाचे निर्देश देण्यात आले आहेत. 
भंडारा जिल्ह्यामध्ये आजपावेतो एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. तरीसुद्धा शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. भंडारा जिल्ह्यामधील 9 शासकीय वसतिगृहामध्ये विस्थापित तसेच मजूर यांच्यासाठी निवारागृह करण्यात आले आहे. येथे आलेल्या कामगार व मजूर व्यक्तींची मानसिक तपासणी तज्ञ डॉक्‍टरांमार्फत करण्यात येते आहे.

या ठिकाणी भोजन, वैद्यकीय तपासणी, योगा व समुपदेशनाची व्यवस्था आहे. आजपर्यंत 44 नागरिकांना योगाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना आखत असून वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार 9 एप्रिलपासून पोलिसांकडून शहरासह जिल्ह्यात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करून दंड वसूल केल्या जात आहे. तसेच मास्क वापरण्याची सक्ती केली जात आहे. 

आतापर्यंत जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. जिल्ह्यातील 17 हजार 846 व्यक्तींना होमक्वारंटाइन करण्यात आले. त्यांनी 28 दिवस घराबाहेर पडू नये. सामान्य रुग्णालय कोरोना वॉर्ड सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. नागरिकांनी आवश्‍यकता नसतांना घराबाहेर पडू नये. सोशल डिस्टन्सिंग पाळून जीवनावश्‍यक व्यवहार पार पाडावे. 
- एम. जे. प्रदीपचंद्रन 
जिल्हाधिकारी, भंडारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com