धक्कादायक...! हरभऱ्याचे आमिष दाखवून त्याला नेले शेतात आणि...

सिध्दार्थ गोसावी
सोमवार, 16 मार्च 2020

आरोपीने दोघांचा पाठलाग केला. पीडित मुलगा आरोपीच्या तावडीत सापडला. पिडीत मुलाला शेतात नेले. त्याचे हात पाय बांधले. त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला.

कोरपना (चंद्रपूर) : पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर नरधमाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघळकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील कोरपना तालूक्‍यात येणाऱ्या निमणी येथे ही घटना घडली. दरम्यान पिडीत मुलाच्या तक्रारीवरुन गडचांदूर पोलिसांनी आरोपी महादेव उत्तम गोंडे याला ताब्यात घेतले आहे.

पिडीत मुलगा (वय 11) आणि त्याचा मित्र ( वय 15) हे दोघेही गावाजवळील शेतात बकऱ्यांची राखण करीत होते. आरोपी महादेव गोंडे हा मुलांजवळ गेला. तुम्हाला हरभरा देतो असे सांगितले अन त्या दोघांना स्वतःच्या शेताकडे मोटारसायकलने घेऊन केला. झाडाखाली मोटारसायकल ठेवली आणि त्या दोघांना कपडे काढायला सांगितले. या प्रकाराने मुले धास्ताविली आणि तिथून दोघांनीही पळ काढला. आरोपीने दोघांचा पाठलाग केला. पीडित मुलगा आरोपीच्या तावडीत सापडला. पिडीत मुलाला शेतात नेले. त्याचे हात पाय बांधले. त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला.

सविस्तर वाचा - अरे बापरे! संशयितांचा उपचार करताना डॉक्‍टरालाच लागण झाल्याचा संशय

या प्रकाराने हादरलेल्या त्या दोघा मित्रांनी घटनेची माहिती आपल्या आईला दिली. आईने व पिडीत मुलाने गडचांदूर पोलिस स्टेशन गाठले. तक्रार नोंदविली. तक्रारीचा आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sexual harassment of minor child