जन्मतःच ती ठरली नकोशी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

नागपूर  : आईपण निसर्गाने बहाल केलेली अमूल्य देणगी. हीच अमूल्य देणगी लाभून ती चिमुकलीची आई झाली.परंतु, प्रसूतीनंतर नाळ कापून 24 तासांतच ती चिमुकली जन्मदात्रीसाठीच नकोशी ठरली. त्या निष्ठुर मातेने चिमुकलीला बेवारसपणे चारचाकी वाहनाच्या खाली ठेवून पलायन केले. मात्र, मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक पाचमधील डॉक्‍टर, परिचारिकांसह खाकी वर्दीतील महिला पोलिसांनी या नकोशीवर माया दाखवली. सध्या तिच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत.

मनीषनगरातील घरकुल सोसायटीत उभ्या कारखाली सकाळी आठदरम्यान नवजात बाळ बेवारस अवस्थेत आढळले. ही घटना पुढे येताच खळबळ उडाली. नकोशीला सोडून पलायन करणाऱ्या त्या निर्दयी मातेविरुद्ध बेलतरोडी पोलिसांत गुन्हा दाखल केला. सकाळी येथील रहिवासी पंकज गोडघाटे कारजवळ गेले असता बाळाच्या रडण्याचा आवाज आला. गाडीखाली वाकून पाहिले असता टॉवेलमध्ये गुंडाळलेले बाळ रडत असल्याचे दिसले. आईची माहिती न मिळाल्याने बेलतरोडी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले. भूकेने व्याकूळ झालेल्या या बाळाला रात्रपाळीत गस्त आटोपून पोलिस निरीक्षक दिलीप साळुंखे, सहायक पोलिस उपनिरीक्षक मन्साराम वंजारी, शिपाई आशीष लक्षणे यांच्या पथकाने मेडिकलमध्ये दाखल केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय तलवारे यांना माहिती दिली.
..
खाकीसह, डॉक्‍टरांची माया
नवजात शिशूचे रडणे ऐकून पोलिसांचे डोळे पाणावले. महिला पोलिसांनी मायेने कुशीत घेत गोंजारण्याचा प्रयत्न केला. बेवारस आढळलेल्या नकोशीचे वय 24 तासांचे असल्याचे सांगण्यात आले. उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. अमिता उईके यांच्या खाकी वर्दीतील पोलिसांतील "आई'ची माया जागी झाली. तिला जवळ घेतले. पोलिसांप्रमाणे मेडिमधील डॉ. शिवानी निमजे यांच्यासह इतरही डॉक्‍टर, परिचारिका या नकोशीला मायेची ऊब देत आहेत. उघड्यावर मातीमध्ये पडल्याने तिला जंतुसंसर्ग झाला आहे. जन्मत:च वजन कमी आहे. उपचार सुरू आहेत. श्‍वास घेण्यास त्रास होत असून, तूर्तास प्रकृतीबद्दल सांगता येत नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She did not want to be born