Shegaon Palkhi : शेगाव येथून श्रींची ५६वी पंढरपूर वारी यंदाही २ जून रोजी सकाळी ७ वाजता प्रारंभ होणार आहे. टाळ, मृदंग, हरिनामाच्या गजरात जवळपास ७०० वारकरी सहभागी होणार आहेत.
शेगाव : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रींची पालखी २ जून रोजी सकाळी ७ वाजता मंदिरातून पायदळ वारी करत पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे. पालखी वारीचे हे ५६ वे वर्ष आहे.