
शेगाव : श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन संत नगरी शेगाव नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये देशव्यापी सर्वेक्षण दरम्यान स्वच्छता विषय उपक्रमांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. एकूण ५६ नगर परिषद मध्ये ९९४८ गुणांसह केवळ बुलडाणा जिल्ह्यातूनच नव्हे तर अमरावती विभागातून सर्वप्रथम येण्याचा मान शेगाव नगर परिषदने मिळवला आहे. सोबतच वॉटर प्लस व स्टार रँकिंगचा सन्मान सुध्दा मिळाला आहे.