

Washim News
esakal
मंगरुळपीर: तालुक्यातील शेलूबाजार परिसरात घरगुती गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून तासन्तास उन्हात उभे राहावे लागत असून, परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. जिल्ह्यातील इतर भागांत गॅस सहज उपलब्ध असताना, शेलूबाजारमध्ये मात्र नागरिकांना पहाटे ३ ते ४ वाजल्यापासूनच रांगा लावाव्या लागत आहेत. तरीही अनेकांच्या वाट्याला निराशाच येत आहे.