
चिमूर : जंगलात जनावरांना चराईसाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवार (ता. २५) दुपारी बारा वाजताच्या सुमारास पळसगाव वनपरिक्षेत्रातील विहिरगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ८५८ परिसरात घडली. मृत गुराख्याचे नाव दयाराम लक्ष्मण गोंडाणे (वय ७० रा. विहीरगाव) असे आहे.