"२०२४ मध्ये शिंदे गटाच्या खासदार गवळींचे डिपॉझिट जप्त होणार"; ठाकरे गटाच्या नेत्यांचा दावा

bhavna-gawli
bhavna-gawli
Updated on

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात विकासाचा दुष्काळ पडला आहे. मायबाप जनता, विद्यार्थी, तरुण, स्त्रिया कोणीही खासदारांच्या कामकाजावर समाधानी नाही. त्यामुळे आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार भावना गवळी यांचे डिपॉझीट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत युवासेना पश्‍चिम विदर्भ सचिव सागर देशमुख यांनी व्यक्त केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून गुरुवारी युवा सेना पदाधिकारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अमरावती येथील युवा नेते तथा पश्‍चिम विदर्भ सचिव सागर देशमुख यांनी विशेष उपस्थिती लावत यवतमाळ-वाशिम लोकसभा क्षेत्राचा संपूर्ण आढावा पदाधिकार्‍यांकडून घेतला.

त्यावेळी खासदार भावना गवळी यांच्या कर्तव्यशून्य कामगिरीबद्दल सर्व समाजघटकांमध्ये मोठ्याप्रमाणात नाराजी आहे. कोणतेही विशेष काम त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केले नसल्याचे वास्तव यावेळी सांगण्यात आल्याने सागर देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना गवळी यांच्यावर जोरदार टीका केली.

शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात विविध घटकांसाठी मोठ्याप्रमाणात काम करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भावना गवळी यांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नसल्याचेही सागर देशमुख यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com