दानापूर एक्स्प्रेस अर्चना अढावच्या कामगिरीला शिव छत्रपती क्रीडा पुरस्काराचे कोंदण

Archana Adhav
Archana Adhav

दानापूर(जि. अकोला) : दानापूर एक्स्प्रेस म्हणून ओळख करणारे तेल्हारा तालुक्यातील ॲथलिट अर्चना अढावला महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कार मंगळवारी जाहीर झाला. हा पुरस्कार तिच्या भरीव कामगिरीची पावती असून, तिच्यावर क्रीडा क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


जगाच्या क्रीडा नकाशावर अकोला जिल्ह्याला मानाचे स्थान मिळवून देणारी दानापूर एक्स्प्रेस अर्चना अढावने आयुष्याच्या खडतर ट्रॅकवर धावत अनेक शिखरे गाठली. क्रीडा क्षेत्रातील या रणरागिणीला राज्य शासनाने क्रीडा पुरस्कार जाहीर करून तिच्या व जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.


तेल्हारा तालुक्यातील दानापूर हे वाण नदीच्या तिरावर वसलेले गाव. याचं गावात अठरारविश्वे दारिद्र्यात असलेल्या कुटुंबात अर्चनाचा अढावचा जन्म 14 जुलै 1995 ला झाला. अर्चना अडीच महिन्याची असतांना अर्चनाच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले. याहीही परिस्थितीत अर्चनाच्या आईने खचून न जाता तिच्या दोन मोठ्या बहिणीचे शिक्षण व लग्न करून दिली. अर्चनाचे शिक्षण हे येथीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत झाले. तिला संघर्ष करण्याचा गुण आईकडूनच मिळाला. पुढे पाचव्या वर्गात येथील हनुमान प्रसाद साह जनता विद्यालयात ती दाखल झाली. येथूनच तिच्या कारकिर्दीने यशाचा ट्रक पकडला. तालुका, जिल्हा, राज्य स्तरीय व पाहता पाहताआंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली. तिच्यातील सुप्त गुण बघून हनुमान प्रसाद साह जनता विघालयाचे व्यवस्थपक डॉ. अजेय विखे यांनी तिला आर्थिक सहकार्य करून पुण्यातील बालेवाडी क्रीडा प्रबोधिनीत दाखल केले. हा तिच्या आयुष्याचा खरा टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर तिने कधीही मागे वळून बघितले नाही. जिल्ह्याचे, तालुक्याचे व गावाचे नाव आज परत एकदा अर्चनाने उज्ज्वल केले. येत्या २२ तारखेला अर्चनाला हा पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.


अर्चनाची कारकीर्द
- चीनमध्ये ज्युनिअर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक
- अमेरिकेतील जागतिक ज्युनिअर स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व
- पटियाला येथे आयोजित वरिष्ठ फेडरेशन चषक स्पर्धेत 800 मीटरमध्ये सुवर्णपदक
-भूवनेश्वर येथिल आशियाई स्पर्धेत सहभागी
- राष्ट्रीय स्पर्धेत 1500 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक.

दानापूर गावाची संपूर्ण महाराष्ट्रात केली
अर्चनाला आज पुरस्कार जाहीर झाला हे ऐकून खूप आनंद झाला. तिने दानापूर गावाची ओळख आज परत एकदा संपूर्ण महाराष्ट्रात केली आहे. आमच्या विद्यालयाला अर्चनाचा अभिमान आहे.
-डॉ. अजेय विखे, व्यवस्थापक, हनुमान प्रसाद साह जनता विघालाय दानापूर.

चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन
महाराष्ट्र शासनाने शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी माझी निवड केली. हा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. या पुरस्काराने भविष्यातील स्पर्धांमध्ये आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
- अर्चना अढाव, आंतरराष्ट्रीय धावपटू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com