वारिस पठाण तुला फाडून टाकेल; शिवसेना आमदाराचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

या देशात राहायचे असेल तर या देशाचे गुणगान गावेच लागणार आणि पाकिस्तानची भाषा बोलत असाल तर त्यांना देशभक्तीचे धडे कसे द्यायचे हे आम्हाला सांगायची गरज नाही असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी दिला.

बुलडाणा : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थातच एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी केलेल्या चिथावणीखोर भाषणाचा वाद सुरू असतानाच, त्यांच्याविरोधात आता बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा वारिस पठाणची जीभ घसरली तर आमच्या हातातील तलवार घसरेल असे आव्हान देणारे वक्तव्य मलकापूर तालुक्यातील जांबुळधाबा येथील शिवजयंती कार्यक्रमात 22 फेब्रुवारी रोजी केले. तसेच सोमवारी मुंबईमध्ये मला 15 कोटी मुस्लिम दाखवा अन्यथा उभे फाडून काढेल, अशा शब्दात चेतावणी दिली. यासंदर्भात व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जांभुळधाबा येथे आयोजित कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी ते बोलताना म्हणाले की, एम.आय.एम.चा नेता वारिस पठाण आपल्या देशात राहून देशाचे खाऊन देश तोडण्याची भाषा करत आहे. कर्नाटकच्या कलबुर्गी येथे 15 फेब्रुवारी एका जाहीर सभेत वारिस पठाण याने आपल्या देशातील 100 कोटी हिंदू बांधवांना खुलेआम आव्हान दिले. आणि 100 कोटीवर 15 कोटी भारी पडतील अशी धमकी दिली. या वारिस पठाणला देशात दंगली घडवायच्या आहे का? तो या देशाचा इतिहास विसरला आहे. 

Image result for sanjay gaikwad
संजय गायकवाड

 

असे का घडले? - ज्ञान देण्यासाठी बोलवायचा अन् करायचा..

धमक्याला आम्ही घाबरत नाही
छत्रपती शिवाजी महाराजांचे 500 मावळेच औरंगजेबाच्या लाख सैन्यावर भारी पडायचे. या देशात राहणारा प्रत्येक हिंदू हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे. त्यामुळे वारिस पठाणच्या धमक्याला आम्ही घाबरत नाही. आतापर्यंत त्यांनी आपल्या महिलांना घरात डामून ठेवले होते. आता त्यांना रस्त्यावर उतरवून सीएए आणि एनआरसीला विरोध करत आहे. एमआयएमचा नेता ओवैसी यांच्या बेंगलुर येथील सभेत एका मुलीने तर पाकिस्तान जिंदाबादचे नारे लगावले. यावरून आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, पडद्यामागे त्यांना काय शिकविल्या जात आहे. जे पडद्यामागे शिकविल्या जाते तेच खरे कधी कधी स्टेजवर बाहेर येते. यांच्या हातात संविधान आहे. मात्र, मनात पाकिस्तान आहे. 

महत्त्वाची बातमी - वंचित सोडून गेले त्यांना पक्षाने भरभरून दिले; मात्र, त्यांना जाण नाही : अशोक सोनोने

ओवैसी काहीच बोलले नाही
हा धोका आपण आजच ओळखला पाहिजे. पाकिस्तानची पहरेदारी करणाऱ्यांना या देशात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. ओवैसी यांच्या समोर वारिस पठाणने देशातील 100 कोटी हिंन्दुना धमकी दिली. मात्र, ओवैसी काहीच बोलले नाही. याचा अर्थ ओवैसी वारिस पठाणच्या मताशी एकमत आहे. अशा नेत्यांना धडा शिकवायचा असेल तर आपल्यालाही संघटित होण्याची गरज आहे. आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पुनर्वात्ती करावी लागेल. 

मुंबईमध्ये मला 15 कोटी मुस्लिम दाखवा अन्यथा
या देशात राहायचे असेल तर या देशाचे गुणगान गावेच लागणार आणि पाकिस्तानची भाषा बोलत असाल तर त्यांना देशभक्तीचे धडे कसे द्यायचे हे आम्हाला सांगायची गरज नाही असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी दिला. जांभुळधाबा येथे आयोजित कार्यक्रमाला विनायक बापू देशमुख, ओमसिंग राजपूत, बाळासाहेब नारखेडे, प्रवीण निमकर्डे, अनुप श्रीवास्तव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यात आमदार गायकवाड यांनी टीका करत सोमवारी मुंबईमध्ये मला 15 कोटी मुस्लिम दाखवा अन्यथा उभे फाडून काढेल, अशा शब्दात चेतावणी दिली आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

‘वारिस पठाणवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा’
वारिस पठाण सारख्या पाकिस्तानी प्रेमींवर छत्रपती शिवाजी महाराजांचे 500 मावळेच भारी पडतील. असे सांगत आमदार संजय गायवाड यांनी वारिस पठाणवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena MLA sanjay gaikwad warning