
बाळापूर (जिल्हा अकोला): अकोला ते खामगाव मार्गावरील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रेस्टॉरंटला आग लावण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज, शुक्रवारी पहाटे ही घटना समोर आली असून, पूर्वीच्या वैमनस्यातून रेस्टॉरंट जाळण्यात आल्याचा आरोप रेस्टॉरंटच्या चालकाने केला आहे.