esakal | यवतमाळमधील आदिवासी नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव मोघेंची काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1612518616208,"A":[{"A?":"I","A":40.96117204730041,"B":757.4925413250903,"D":177.1380296898291,"C":54.429685486511126,"a":{"B":{"A":{"A":"MAERm569oiM","B":1},"B

काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून शिवाजीराव मोघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदिवासींसाठी सतत काम करणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे.

यवतमाळमधील आदिवासी नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव मोघेंची काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर: महसूल मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनतर आता प्रदेशाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार तसंच प्रदेश कार्यकारिणीमध्ये कोणाला स्थान मिळणार यावर राजकीय चर्चा रंगल्या होत्या. त्याप्रमाणे आज काँग्रेसनं प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात साकोलीचे आमदार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आज. तर यवतमाळचे काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची नियुक्ती झाली आहे. 

काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून शिवाजीराव मोघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदिवासींसाठी सतत काम करणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. यवतमाळमधील केळापूर आणि आर्णी या तालुक्यांचे आमदार राहिले आहेत. तसंच ते २००९ ते २०१४ या कालावधीत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री होते. 

हेही वाचा - आता प्रदेशाध्यक्षपदही विदर्भालाच, काँग्रेसचा 'हात' विदर्भाच्याच डोक्यावर का? वाचा स्पेशल रिपोर्ट

१९८०, १९८५ आणि १९९९ साली ते महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. तसंच नागपूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही त्यांनी भूषवलं आहे, नागपूरला ३०० वर्षं पूर्ण होण्याच्या निमित्यांनं घेण्यात आलेल्या त्रिशताब्दी कार्यक्रमात त्यांनी पुढाकार घेतला होता. 

काँग्रेस विदर्भात आपली पाळंमुळं मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत आहे. अगदी मंत्रिपदापासून तर आता प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदापर्यंत सर्वच पदांवर विदर्भातील नेत्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळेच शिवाजीराव मोघे यांच्यासारख्या जुन्या जाणकार नेत्यांवर विश्वास टाकत काँग्रेसनं त्यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. 

हेही वाचा - 'नानां'ची काठी थेट मोदी सरकारवर, केंद्रसरकारविरोधात संघर्ष

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी माझ्यावर विश्वास ठेवत ही जबाबदारी दिली. त्यांचा विश्वास सार्थ करण्याचा मी नक्की प्रयत्न करीन.  
-शिवाजीराव मोघे 
काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष 

संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ 

loading image