esakal | आमदारांची अशीही शिवभक्ती अन् पोहोचले रायगडावर
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay gayakwad.jpg

ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी गोरगरीब जनतेची सेवा केली, तोच आदर्श घेत आपणही बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाकरिता प्रयत्नशील राहू असे अभिवचन यावेळी त्यांनी घेतले.

आमदारांची अशीही शिवभक्ती अन् पोहोचले रायगडावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर आ.संजय गायकवाड यांनी 14 फेब्रुवारीला पुन्हा रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत नवस फेडला. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी गोरगरीब जनतेची सेवा केली, तोच आदर्श घेत आपणही बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या विकासाकरिता प्रयत्नशील राहू असे अभिवचन यावेळी त्यांनी घेतले.

निवडणुकांपूर्वी अनेक नेते देवीदेवतांच्या मंदिरात जाऊन अभिषेक करतात. मात्र, पुरोगामी विचारसरणीचे असलेल्या संजय गायकवाड यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले होते. त्यानंतर त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करत बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या इतिहासात सर्वाधिक 27 हजार मताधिक्‍यांनी विजय मिळविला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि रायगडावर केलेली घोषणा त्यांचे नवस फेडण्याकरिता आमदार झाल्यानंतर संजय गायकवाड शिवजयंतीच्या पूर्वी पहिल्यांदा रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे नवस फेडला. 

महत्त्वाची बातमी - नोकरीचे आमीष दाखवून लाखोंचा गंडा

शहिदांनाही विसरले नाही
रायगडावर गेल्यानंतर आ.संजय गायकवाड आपल्या वीर शहीद जवानांना विसरले नाही. 14 फेब्रुवारी 2019 मध्ये काश्‍मिरमध्ये आतंकवाद्यांनी हल्ला करून 40 जवानांना शहीद केले होते. या शहिदांना त्यांनी सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राजमाता मॉ जिजाऊंच्या समाधीस्थळी दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत युवानेते मृत्यूंजय गायकवाड, श्रीकांत गायकवाड, आशिष जाधव, पृथ्वीराज गायकवाड, नयन शर्मा, नितीन राजपूत, ज्ञानेश्वर खांडवे, प्रवीण निमकर्डे, दीपक तुपकर, वैभव इंगळे, अशोक इंगळे, सचिन कोठाडे, नीलेश डांगे व योगेश मुळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.