चंद्रपूर : देवटोक येथे उत्‍खननात सापडली शिवपिंड; ५ फूट लांब आणि १ फूट उंच

चंद्रपूर : देवटोक येथे उत्‍खननात सापडली शिवपिंड; ५ फूट लांब आणि १ फूट उंच

Published on

सावली (जि. चंद्रपूर) : वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या देवटोक येथे नवीन मंदिराचे बांधकाम (Construction of a new temple at Devtok) सुरू आहे. जेसीपीच्या माध्यमातून खोदकाम सुरू असतानाच शिवपिंड आढळून (Shivpind found) आली. शिवपिंड आढळल्याची माहिती मिळताच भाविकांनी गर्दी केली होती. दरम्यान, खासदार अशोक नेते (MP Ashok Nete) यांनी देवटोक येथे भेट दिली. येथे सभा मंडपासाठी पंधरा लाख रुपये देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. (Shivpind-found-in-excavation-at-Devtok-in-Chandrapur-district)

वैनगंगा नदीच्या काळावर देवटोक हे गाव वसले आहे. या गावात नवीन मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. २५ मे रोजी कॉलमसाठी जेसीपीच्या माध्यमातून खोदकाम करण्यात येत होते. खोदकामादरम्यानच जवळपास अंदाजे ५ फूट लांब आणि एक फूट उंचीची पुरातन शिवपिंडी आढळून आली. याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांनी येथे भेट देत शिवपिंडीची विधिवत पूजा केली.

चंद्रपूर : देवटोक येथे उत्‍खननात सापडली शिवपिंड; ५ फूट लांब आणि १ फूट उंच
वाघाचा थरार! एकाला मानेला पकडून नेले ओढत, तर दुसऱ्याला झाडावरून खेचले खाली

बुधवारी (ता. २६)  खासदार अशोक नेते यांनी देवटोक येथे भेट देत पाहणी करीत  पूजा अर्चना केली.  सभामंडपसाठी १५ लाख रुपये देत असल्याची माहिती दिली. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार, नायब तहसीलदार सागर कांबळे, ठाणेदार शिरसाट, श्रीपुण्यभूमी तीर्थक्षेत्र मुरकुंडेश्वर देवस्थानाचे अध्यक्ष संत मुरलीधर महाराज, उपाध्यक्ष पत्रुजी चौधरी, सचिव नरेश जकुलवार, सुरेंद्र उरकुडे, सूरज बोम्मावार, पुंडलिक पाल, नामदेव हजारे, भास्कर पोहनकार यांची उपस्थिती होती. यावेळी ट्रस्टने भक्तनिवास बांधकामासाठी निधी मंजूर करावा या मागणीचे निवेदन खासदार अशोक नेते यांना दिले.

(Shivpind-found-in-excavation-at-Devtok-in-Chandrapur-district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com