Sambhaji Bhide: शिवराज्याभिषेक दिन सर्वांत मोठा उत्सव; संभाजी भिडे, अमरावती येथे पदाधिकाऱ्यांची बैठक
Amravati News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकामुळेच आपण आज स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिन साजरे करू शकतो, असे प्रतिपादन संभाजी भिडे यांनी अमरावतीत केले. जय भारत मंगलम् येथे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी युवकांना राष्ट्रसेवेची प्रेरणा दिली.
अमरावती : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून शिवराज्याभिषेक दिवस सोहळा साजरा केला नसता तर १५ ऑगस्ट व २६ जानेवारीसारखे महत्त्वाचे दिवस आपण मुक्तपणे साजरे करू शकलो नसतो.