Video : दानवेंची जीभ कापणार्‍यास दहा लाख आणि बारा लाखांची गाडी; शिवसेना संपर्क प्रमुखाची खळबळजनक घोषणा

चेतन देशमुख 
Saturday, 12 December 2020

मी त्यांची जीभ कापायला निघालो आहे तुम्हीही निघा, शेतकर्‍यांचा अपमान आम्ही सहन करु शकत नाही, अशा शब्दांत यवतमाळ विधानसभेचे संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली आहे.

यवतमाळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे सतत शेतकर्‍यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांची जीभ कापणार्‍यास दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस तसेच बारा लाखाची गाडी भेट देण्यात येईल. मी त्यांची जीभ कापायला निघालो आहे तुम्हीही निघा, शेतकर्‍यांचा अपमान आम्ही सहन करु शकत नाही, अशा शब्दांत यवतमाळ विधानसभेचे संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली आहे.

अधिक माहितीसाठी - राणे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणाचे गूढ उकलले : कुत्र्याचे इंजेक्शन देऊन पत्नीने केला पती, मुलांचा खून

केन्द्र शासनाने पारीत केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे शेतकर्‍यांचे आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन पाकिस्तान तसेच चीनचे षडयंत्र असल्याचे वक्तव्य केन्द्रीय राज्य मंत्री, भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी केले.  या वक्तव्याच्या विरोधात शनिवार (ता.12) स्थानिक दत्त चौकात शिवसैनिकानी आंदोलन करीत निषेध नोदविला. 

भाजपाचे सरकार कुठलाही गंभीर विषय समोर आला की बुध्दीभेद करतांना दिसून येते. वेगवेगळया विषयांत गुंतवून नागरीकांची दिशाभूल करण्याचे कार्य भाजपाचे सरकार करीत आहे. आता तर काळया कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत असतांना त्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान तसेच चिनचे षडयंत्र असल्याचे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले आहे. तसेच शिवसेनेच्या सर्वच पदाधिकार्‍यांनी देशभरात वाढत असलेल्या पेट्रोल तसेच डिजल भाववाढीच्या विरोधात संताप व्यक्त केला. 

जाणून घ्या - मैत्रिणीवर शेरेबाजी केल्याने काढली पिस्तूल; क्षणभरात ढाबा रिकामा झाल्यानंतर सत्य आले समोर

यानंतर शिवसैनिकांनी रावसाहेब दानवे यांचा पुतळा जाळला. यावेळी जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, किशोर इंगळे, संजय रंगे, सागर पुरी, पिंटू बांगर, मंदा गाडेकर, निर्मला विनकरे, काजल कांबळे, अमोल धोपेकर, संतोष चव्हाण, मनीष लोळगे, रुपेश सरडे, गिरीजानंद कळंबे आदी उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena leader from yavatmal announced prize for criticizing Danve