स्कूलव्हॅनला शिवशाहीने उडविले; तीन विद्यार्थ्यांसह पाच जखमी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

अमरावती : विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूलव्हॅनच्या समोर दुचाकीस्वार घसरल्याने व्हॅनचालकाने अचानक ब्रेक मारले. त्यामुळे मागून येणारी शिवशाही बस व्हॅनवर आदळली. शहरात शुक्रवारी घडलेल्या या विचित्र अपघातात तीन विद्यार्थ्यांसह पाचजण जखमी झाले. ग्रामीण पोलिस पेट्रोलपंप ते जिल्हा परिषद कन्या हायस्कूल मार्गावरील जुन्या आशीर्वाद मंगल कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. 13) दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात झाला.

दुचाकीस्वार व्हॅनसमोर घसरला

शाळा सुटल्यानंतर काही विद्यार्थ्यांना सोडून एमएच 27 एक्‍स 9667 क्रमांकाची व्हॅन तीन विद्यार्थ्यांना घेऊन पुढे निघाली होती. जिल्हा परिषद कन्या शाळा ते पोलिस पेट्रोलपंप मार्गाने दर्यापूरवरून नागपूरला जाणारी एमएच 06 बीडब्ल्यू 1231 क्रमांकाची शिवशाही बस येत होती. शिवशाहीसमोर अचानक स्कूलव्हॅन आली. व्हॅनच्या पुढे एक दुचाकीस्वार होता. दुचाकीस्वार अचानक व्हॅनसमोर घसरला. त्यामुळे व्हॅनचालकाने ब्रेक मारले. त्यावेळी मागून येणाऱ्या शिवशाहीने व्हॅनला धडक दिली. यात व्हॅनचा मागील भाग चेपला तसेच तीन विद्यार्थीही जखमी झाले. त्यापैकी एक गंभीर असल्याचे चालकाने सांगितले.

जखमी  विद्यार्थी रुग्णालयात दाखल

आयुष अग्रवाल, सक्षम अडवानी आणि आर्या देशमुख अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे असून, ते गोल्डन किड्‌स इंग्लिश हायस्कूलचे इयत्ता पाचवी ते सातवीचे विद्यार्थी आहेत. या व्यतिरिक्त व्हॅनचालक शहजाद खान तसेच दुचाकीस्वार या अपघातात जखमी झाले. विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून व्हॅनचालकावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकीस्वार स्वत:च निघून गेला. अपघातानंतर रस्त्यावर गर्दी जमली. गाडगेनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. 

स्कूलव्हॅन तपासणीही वाऱ्यावर 

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा जर अपघात झाला तर त्यात प्राथमिक उपचारासाठी आवश्‍यक बॉक्‍स आहे काय, याची शहानिशा कुणीच करीत नाही. कारण शालेय परिवहन समित्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणीच करीत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivshahi bus collision with school van ; Five injured with three students