यवतमाळमध्ये राज्यमंत्री मदन येरावार यांना धक्का

सुरेश भुसारी
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

जिल्ह्यातील नगराध्यक्षपदाचे निकाल
यवतमाळ- कांचन चौधरी (शिवसेना)
पुसद- अनीता नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
घाटंजी- नयना ठाकूर (घाटंजी आघाडी)
आर्णी- अर्चना मंगम (शिवसेना)
दारव्हा- बबन इरवे (शिवसेना)
वणी- तारेंद्र बोर्डे (भाजप)

सेनेच्या कांचन चौधरी विजयी
नागपूर - उर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांना त्यांच्या गावातच पराभव स्वीकारावा लागला. शिवसेनेत नुकत्याच दाखल झालेल्या कांचन चौधरी यांनी यवतमाळ नगराध्यक्षपदी सेनेसाठी विजयश्री खेचून आणली. सेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सेनेच्या तीन नगराध्यक्ष निवडून आणण्यात यश मिळविल्याने त्यांचे राजकीय वजन वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळच्या राजकारणावर मदन येरावार यांचे वर्चस्व आहे. नगरपरिषदेमध्येही भाजपची सत्ता होती. या निवडणुकीतही भाजपच्या रेखा कोठेकर निवडून येतील, असे बोलले जात होते. यवतमाळ जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत. भाजपचे वर्चस्व राहिलेल्या यवतमाळ जिल्ह्यात सेनेने तीन नगरपरिषदा काबीज केल्याने राठोड यांचे जिल्ह्यातील राजकारणात वजन वाढले आहे. यवतमाळ, आर्णी व दारव्हा या तीन नगरपरिषदामध्ये सेनेने भगवा फडकाविला आहे. कांचन चौधरी यांना शिवसेनेत आणण्यात संजय राठोड यांनी मोठी भूमिका बजावली होती. 

नाईकांचा किल्ला शाबूत
याच जिल्ह्यातील पुसद येथील नगरपरिषद कायम राखून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मनोहर नाईक यांनी वर्चस्व सिद्ध केले आहे. यापूर्वी राष्ट्रवादीकडे असलेले नगरपालिका कायम राखली. यातून नाईक यांनी परंपरागत बालेकिल्ला कायम राखल्याचे स्पष्ट झाले असून विरोधकांना हा किल्ला भेदता आला नाही. भाजप-सेना व कॉंग्रेसची पुसदमध्ये डाळ शिजू शकली नाही.

जिल्ह्यातील नगराध्यक्षपदाचे निकाल
यवतमाळ- कांचन चौधरी (शिवसेना)
पुसद- अनीता नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
घाटंजी- नयना ठाकूर (घाटंजी आघाडी)
आर्णी- अर्चना मंगम (शिवसेना)
दारव्हा- बबन इरवे (शिवसेना)
वणी- तारेंद्र बोर्डे (भाजप)

Web Title: shock to yerawar in yavatmal