
-अविनाश साबापुरे
यवतमाळ : एकीकडे जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांना निखंदून काढण्यासाठी सरकार प्रबळ पावले उचलत आहे. तर दुसरीकडे शहरात गल्लीबोळात दादा, भाई, भोंदूंनी उच्छाद मांडला आहे. महिलांची असुरक्षा हा ऐरणीवरचा विषय असतानाच आता तब्बल 76 हजार अल्पवयीन मुला-मुलींनाही अत्याचाराचे शिकार व्हावे लागले आहे. त्यामुळे हीच का प्रौढांची मर्दुमकी, असा सवाल विचारण्याची वेळ आली आहे.