Buldhana Crimeesakal
विदर्भ
Buldhana Murder Case : जुन्या वादातून दगडाने ठेचून एकाची हत्या; तरुणाला अटक, भीतीचे वातावरण
Stone Attack Killing Buldhana : जुना वाद विकोपाला जावून एकाची दगडाने ठेचून हत्या झाल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यातील हरणी गावात २७ ऑगस्ट रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी काशीराम शिवराम कुसळकर रा. हरणी, या तरुणाला अटक केली आहे.
मंगरूळ नवघरे,
(चिखली) : जुना वाद विकोपाला जावून एकाची दगडाने ठेचून हत्या झाल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यातील हरणी गावात २७ ऑगस्ट रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. मृतकाचे नाव गजानन बारकू पवार (वय ५५) असे असून या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी काशीराम शिवराम कुसळकर रा. हरणी, या तरुणाला अटक केली आहे.