
अमरावती : महापालिकेच्या इतवारा बाजार येथील काही गाळ्यांतून अवैध व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाच ओळीतील गाळे मूळ भाडेकरूंकडून घेत त्याठिकाणी वरली-मटक्याचा व्यवसाय केल्या जात असताना हा प्रकार महापालिका व पोलिसांच्याही लेखी नाही. दिवसेंदिवस हा व्यवसाय चांगलाच फोफावत असून त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.