धक्कादायक ः ग्रामस्थांचे आरोग्य धोक्‍यात; जलशुद्धीकरण यंत्रणेचा ठणठणाट

file photo
file photo
Updated on

धामणगावरेल्वे(अमरावती) ः गावागावांमध्ये पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, अजूनही कोणत्याच गावातील नळयोजनेला जलशुद्धीकरण यंत्रणा लावली नाही. त्यामुळे अशुद्ध पाण्याचा पुरवठा होऊन आजारांचा धोका बळावल्याचे शिदोडी येथील अतिसाराच्या साथीने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईसोबतच पावसाळ्यातील साथरोगांवर मात करण्यासाठी प्रशासनाने ग्रामपंचायत स्तरावर जलशुद्धीकरण यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
तालुक्‍यातील विविध गावांमध्ये पाणीपुरवठा योजना उभारण्यात आल्या आहेत. या योजनांना ग्रामपंचायत प्रशासनासह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नळाद्वारे पाणी घेणारे नागरिक पाणीकराच्या माध्यमातून शासनाला महसूल देत आहेत. मात्र, नळाद्वारे मिळणारे पाणी शुद्ध आहे का?, असा प्रश्‍न निर्माण होतो. वास्तविक मुबलक व शुद्ध पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. मात्र, प्रशासनाकडून केवळ मुबलक पाणी देण्यावरच अधिक भर असल्याचे दिसून येते. काही महत्त्वाचे ठिकाण वगळता इतर ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे ग्रामीण भागात नळाद्वारे उपलब्ध होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही शंका उपस्थित केली जात आहे. पावसाळ्याच्या दिवसांत नदीनाल्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते.


या कालावधीत स्थानिक प्रशासनाकडून नळांद्वारे गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा केला जातो. हे पाणी आरोग्यास हानीकारक आहे, हे लक्षात येऊनही नागरिकांना नाइलाजास्तव या पाण्याचा वापर करावा लागतो. अशावेळी काही आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास प्रशासनाकडून उपचाराच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, अशाप्रकारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. काही ठिकाणी पाण्याची टाकी नसल्याने थेट पाणीपुवठा करण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण नागरिकांचा आरोग्याचा प्रश्‍न पुढे आला आहे.

दूषित पाणी आढळल्यास माहिती द्या
नागरिकांनी दूषित पाणी पिऊ नये. ज्या ठिकाणी दूषित पाणी आढळले, त्याबाबत आरोग्य विभागाला कळवावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांनी केले आहे.

वाठोडा गावाप्रमाणे आरओ प्लांट उभारावे
वरुड तालुक्‍यातील एकमेव अशा वाठोडा बु. या गावाने आरओ प्लांट बसवून भर उन्हाळ्यातही गावकऱ्यांची तहान भागविण्याची किमया साधली आहे. त्याच धर्तीवर इतर गावांत आरओ प्लांट बसवून नागरिकांची समस्या निकाली काढण्याची गरज आहे.

-संपादन ः चंद्रशेखर महाजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com