बंदुकीने ‘तो’ उडवितो कलदार

शेखर चौधरी
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

मोर्शी - प्रशिक्षण न घेता केवळ छंद म्हणून मोर्शी शहरातील संतोषकुमार ज्योतीकुमार पेठे हा युवक आपल्या नेमबाजीने १५ मीटरवरून कलदार उडवितो. 

बालपणापासूनच संतोषकुमारला नेमबाजीची आवड होती; परंतु कौटुंबिक जबाबदारी व शेतीच्या व्यापामुळे इच्छा असतानाही त्याबाबतचे कोणतेही प्रशिक्षण तो घेऊ शकला नाही. महाविद्यालयात शिकत असताना नेमबाजी हा विषय क्रीडास्पर्धेत नव्हता. त्यामुळे तो तरबेज असला तरी त्याला आपले कौशल्य जगाला दाखविता आले नाही, याची त्याला खंत होती. पण त्याने हिंमत न हारता छंद जोपासला अन्‌ आज नेमबाजीत पारंगत झाला.

संतोषकुमारने रायफल चालविण्याकरिता कोणत्याही प्रशिक्षकाचे सहकार्य घेतलेले नाही. तरीही त्याच्याकडे आज चार रायफली आहेत. यात १.७७ कॅलिबर डायना, १.७७ कॅलिबर पर्सीहोल पीसीबी, १.७७ कॅलिबर बेंजामिन व लॉग रेंजमध्ये ७.६२ (३०-६०) रायफली आहेत. संतोषकुमारचा शेतीचा व्यवसाय आहे. तो जोपासत बंदुकीच्या नेमबाजीचा तो फावल्या वेळेत सराव करतो. त्याने व्यावसायिक स्पर्धेत सहभाग घेतल्यास व योग्य प्रशिक्षक मिळाल्यास निश्‍चितच यश प्राप्त करील, अशी त्याला अपेक्षा आहे. बंदुकीच्या नेमबाजीचा सराव करताना ५० फुटांवरील कुठलेही लक्ष्य संतोषकुमार लीलया टिपू शकतो, असे त्याने सांगितले.

नेमबाजीची ॲकेडमी काढण्याचा मानस 
ग्रामीण विद्यार्थ्यांना ठरावीक खेळांचेच प्रशिक्षण दिले जाते. परंतु; आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक महत्त्वाच्या खेळांचा समावेश असल्याने त्यांचे प्रशिक्षणसुद्धा त्यांना मिळावे. यास्तव भविष्यात या युवकांकरिता मोर्शी परिसरात नेमबाजीची ॲकेडमी काढण्याचा आपला मानस आहे.
-संतोषकुमार पेठे

Web Title: Shooting Hobby Santoshkumar Pether