esakal | संरक्षण मिळेपर्यंत दुकान बंदच राहणार!
sakal

बोलून बातमी शोधा

washim

संरक्षण मिळाल्याशिवाय सलूनची दुकाने बंदच राहतील, असा निर्धार जिवा संघटनेच्या पुढाकारात सलून संचालकांनी घेतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिवा संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

संरक्षण मिळेपर्यंत दुकान बंदच राहणार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रिसोड,  : संरक्षण मिळाल्याशिवाय सलूनची दुकाने बंदच राहतील, असा निर्धार जिवा संघटनेच्या पुढाकारात सलून संचालकांनी घेतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिवा संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 


जीवनावश्यक विक्रीच्या दुकानात सोबतच सलूनच दुकाने सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र, ग्राहकांच्या दरम्यान सोशल डिस्टन्सिंग जबाबदारी दुकानदारांनाच घेणे आहे. जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. असे असले तरी रिसोड शहरात होणार्‍या गर्दीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या गर्दीमुळे वाहतूक ठप्प होत होती. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाला दमछाक होते आहे. सलून व्यावसायिक द्विधा मनस्थितीत सापडला आहे. कारण कोविड- 19 संसर्गजन्य रोग असून तो एका व्यक्तीपासून दुसर्‍यास होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आमचा व्यवसाय हा माणसांशी संपर्क येणारा आहे. यावर उपाय म्हणून शासनाने सुरक्षा किट देणे, तंत्रशुद्ध पद्धतीने शासनाच्या नियमानुसार आम्ही काम करण्यास तयार आहोत. लॉकडाऊनमुळे व्यवसाय थांबला. त्यामुळे कुटुंबावर उपासमारची वेळ आली आहे. त्यामुळे जोपर्यंत संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सलुनची दुकाने उघडणार नसल्याचा निर्धार करण्यात आला आहे. 

रविवारी नोंदविला मूक निषेध
रिसोड येथील सलून व्यावसायिकांनी रविवारी (ता. 24) दुकानासमोर सोशल डिस्टन्सचे पालन करत मूक निषेध नोंदविला. शासनाकडून किमान आरोग्य संरक्षक किट मिळावे, प्रशासनासह तालुका प्रशासनाने आमच्या मागणीचा विचार करून दिलासा द्यावा, अशी मागणी जिवा संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.