esakal | कलावंतांनी साकारला सुरेख लघुपट
sakal

बोलून बातमी शोधा

NGP

सरकारने कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण राज्यभरात " माझे कुटुंब- माझी जबाबदारी " ही मोहीम सुरू केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी विशेष सहभाग घेऊन मोहिमेविषयी जनजागृती करावी, असा शासनाचा उद्देश आहे. याच धरतीवर नगराध्यक्ष प्रा. रत्नमाला भोयर यांनी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या शीर्षकाविषयी संकल्पना मांडली. त्यातूनच मीच माझा रक्षक अर्थात माझे कुटुंब माझी जबाबदारी हा लघुपट साकारला गेला.

कलावंतांनी साकारला सुरेख लघुपट

sakal_logo
By
विनायक रेकलवार

मूल (चंद्रपूर) : कोरोना या संसर्गजन्य आजारावर आधारित तालुक्‍यातील स्थानिक कलावंतांनी "माझे कुटुंब,माझी जबाबदारी" हा लघुपट साकारला आहे. या प्रबोधनात्मक लघुपटातून एक सामाजिक संदेश देण्यात आला आहे. आपली संकल्पना प्रत्यक्षात उतरविणाऱ्या नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर यांनी लघुपटात मार्गदर्शकाची भूमिका साकारली आहे. लघुपटाचे दिग्दर्शन झाडीपट्टीतील गायक आणि नाट्य कलावंत संतोष वरपल्लीवार यांनी केले आहे. लघुपटाचे चित्रीकरण नवेगाव येथे झाले.

सरकारने कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण राज्यभरात " माझे कुटुंब- माझी जबाबदारी " ही मोहीम सुरू केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी विशेष सहभाग घेऊन मोहिमेविषयी जनजागृती करावी, असा शासनाचा उद्देश आहे. याच धरतीवर नगराध्यक्ष प्रा. रत्नमाला भोयर यांनी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या शीर्षकाविषयी संकल्पना मांडली. त्यातूनच मीच माझा रक्षक अर्थात माझे कुटुंब माझी जबाबदारी हा लघुपट साकारला गेला.

सामाजिक कार्यकर्ता प्रभाकर भोयर यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. कोरोनामुळे शहरातील उद्योगधंदे बंद पडले. गड्या अपुला गावच बरा असे म्हणत राहुल आपल्या स्वगावात पोहोचतो. राहुलचा मोठा भाऊ व्यसनाधीन असतो. एकमेकांच्या संपर्कातून आणि संसर्गातून कोरोनाचा कसा प्रसार होतो आणि शेवटी कुटुंबाला दुःखात बुडावे लागते. हे या लघुपटात दाखविले गेले आहे.

सविस्तर वाचा - जाणून घ्या यंदाच्या नवरात्रातील नऊ दिवसांचे नऊ रंग

कुटुंब म्हणून आवश्‍यक असलेली काळजी घरातील सर्व सदस्यांनी घ्यावी. कोरोनापासून बचावासाठी आवश्‍यक ती पथ्य पाळावीत. कोरोनासारख्या विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्‍यक आहे हा संदेश लघुपटातून देण्यात आला आहे. संवाद आणि पटकथा निर्मला टेंभुर्णे यांनी लिहिली आहे. यात विद्या देवगडे, रत्नमाला भोयर, सुनील कुकूडकर, संतोषकुमार, दिनेश कोलटवार, चैतन्य भोयर, सोनू कोरांगे,भास्कर मेश्राम,रुपेशकुमार नंदेश्‍वर, राऊत, बालू सतरे या कलावंतांनी भूमिका साकारल्या आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image