Shri Renukadevi : अजूनही इथे जिभेवर त्रिशूल टोचून फेडला जातो नवस

चर्मकार बांधव जपताहेत पिढ्यापिढ्यांची सांस्कृतिक परंपरा
Shri Renukadevi Temple at Chikhali in Buldana here vow is paid by piercing trishul on tongue
Shri Renukadevi Temple at Chikhali in Buldana here vow is paid by piercing trishul on tongue

चिखली : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील श्री रेणुकादेवी मंदिर प्राचीन म्हणुन प्रसिद्ध आहे. शहराचेच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचे आराध्य दैवत असणारे ग्रामदेवता आदिमाया आदीशक्ती श्री रेणुकादेवी हे सर्वश्रेष्ठ शक्तीपीठ आहे.

विशेष म्हणजे याठिकाणी असलेले चर्मकार बांधव हजारो वर्षांपासून चालत आलेली नवस पूर्ण करण्याची परंपरा पिढ्यापिढ्या चालवत आहे. आपल्या नवसपूर्तीकरिता जिभेवर त्रिशूल टोचून नवसपूर्ती करीत असले तरी यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास होत नसून देवीवर असलेल्या भक्तीमुळे हे शक्य असल्याची मान्यता आहे.

जुन्या जाणत्या लोकांच्या म्हणण्यानुसार जेव्हापासुन चर्मकार बांधव याठिकाणी वास्तव्यास आले, तेव्हापासुन ही प्रथा अविरतपणे सुरू आहे. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा चर्मकार बांधवांचे कुलदैवत तुळजाभवानी देवी,

तुळजापुर येथे सर्वप्रथम सुरू झाल्याचे जुनेजाणते मंडळी सांगतात. संत रविदास महाराज यांची जयंती तसेच तुळजापुरच्या देवीच्या यात्रा (चैत्र पौर्णिमा) दांडी पौर्णिमेनिमित्त येते.त्याचदिवशी देवीला केलेला नवस पूर्ण करण्याचा दिवस शुभ मानला जातो.चर्मकार समाजातील पुरूष तथा महिलांचा यामध्ये लक्षणीय सहभाग असतो.

चिखली तालुक्यातील गोदरी, येवता, केळवद, रोहडा, गांगलगांवसह पंचक्रोशीतील येथील चर्मकार बांधव दरवर्षी गळ टोचून आपला नवस पूर्ण करतात. देवीला केलेला नवस पूर्ण झाल्यानंतर यात्रेच्या दिवशी हा नवस पूर्ण करावयाचा असतो.

त्याकरिता काही गळकरी नऊ दिवसाचे तर काही गळकरी पाच दिवसाचे कडक उपवास करतात. गळकरी रविदास नगरात असलेल्या महामाया देवी येथे गळ टोचून वाजतगत अनवाणी पायाने ही मिरवणुक रेणकामातेच्या मंदिरात पोहचते.

याठिकाणी देवीला पाच प्रदक्षिणा घालुन मिरवणुक मंदिर परिसरातून निघून चिंच परिसर मार्गे जुनागाव परिसरात असलेल्या मरिमाता मंदिरात पोहचते. रेणुकामातेचे माहेर शेलुद येथे असलेली रेणुका देवी, सवणा रोड येथे असलेल्या पाळेची देवी, तसेच चिखली शहरातील रेणुकादेवी या तीन बहीणी असून पुर्वीच्या काळी शहरातील शेवटच्या ठिकाणी असलेले मरीमातेचे मंदिर असल्यामुळे याठिकाणी गळकरी आपले गळ काढत असल्यामुळे ती प्रथा पडुन ती आजही सुरू आहे.

त्रिशुलाची काळजीपूर्वक होते स्वच्छता

यात्रेच्या एक दिवसाअगोदर गाडेभेट दर्शन करण्याकरिता समस्त गळकरी जुन्या गावात असलेल्या वगदीचे पुजन करतात. यादरम्यान त्रिशुलाची काळजीपूर्वक स्वच्छता करून घेण्यात येते. खोबऱयाच्या वाटीने घासुन त्रिशुल पूर्णपणे स्वच्छ तसेच गंजरहित करण्यात येतो. यात्रेच्या दिवशी नवस केल्याप्रमाणे काही गळकरी सवणा रोडवर असलेल्या पाळेची देवी येथून गळ टोचुन निघतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com