Pandharpur Wari : श्री संत वासुदेव महाराज पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान; पूजन व वारकरी भजनानंदात होणार प्रस्थान, स्वागताची तयारी
Shri Sant Vasudev Maharaj : श्री संत वासुदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज अकोटहून श्री क्षेत्र पंढरपूर वारीसाठी प्रस्थान होणार आहे. विविध धार्मिक कार्यक्रम आणि कीर्तन यांच्याद्वारे उत्साहपूर्ण सोहळा साजरा होणार आहे.
अकोट : वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु सद्गुरू श्री संत वासुदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज (ता.७) श्री क्षेत्र पंढरपूर वारीकरिता प्रस्थान होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम सुनियोजित आहेत.