अंबाजोगाई तालुक्यात भावंडांचा बुडून मृत्यू

शिवकुमार निर्मळे
रविवार, 29 एप्रिल 2018

तालुक्यातील अकोला येथे विहिरीवर पोहायला गेलेल्या चुलत भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २९) दुपारी घडली. परमेश्वर हनुमंत आगळे (वय १८) व ज्ञानेश्वर महादेव आगळे (१८) (दोघेही रा. अकोला, ता. अंबाजोगाई) अशी बुडून मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. 

अंबाजोगाई : तालुक्यातील अकोला येथे विहिरीवर पोहायला गेलेल्या चुलत भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २९) दुपारी घडली. परमेश्वर हनुमंत आगळे (वय १८) व ज्ञानेश्वर महादेव आगळे (१८) (दोघेही रा. अकोला, ता. अंबाजोगाई) अशी बुडून मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. 

परमेश्वर व हनुमंत या या दोघांनीही यंदा इयत्ता १२ वीची परीक्षा दिली होती. तर, परमेश्वर नीट परीक्षेची तयारी करत होता. 6 मे रोजी त्याची परीक्षा होती. दरम्यान, रविवारी दोघेही चुलत भावंडे नातेवाईकांसह शेतात होते. दुपारच्या वेळी उन्ह तापल्याने दोघेही पोहण्यासाठी विहिरीत उतरले होते. मात्र, पोहायला नीट येत नसल्याने दोघेही बुडाले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज येताच बाजूला असलेल्या परमेश्वर याचे वडील हनुमंत आगळे यांनी विहिरीत उडी घेऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. 

दोघांना बाहेर काढून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, मागच्या दहा दिवसांपूर्वी पोहता येत नसताना विहिर गोवर्धन (ता. परळी) येथे कॅनॉलमध्ये बुडून दोन शिक्षकांचा मृत्यू झाला होता.

Web Title: Siblings drowning in Ambajogai taluka

टॅग्स