
बुलडाणा : गिर्यारोहणासाठी लागणारे प्रशिक्षण आणि साहित्य सामग्री केवळ शहरात असल्याने या क्षेत्रात शहरातील गिर्यारोहकच उत्कृष्ट कामगिरी बजावू शकतात. हा समज बुलडाणा तालुक्यातील साखळी बुद्रुक या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या नऊ वर्षीय सिद्धीने आपल्या कर्तृत्वाने खोटा ठरविला आहे.