silent morcha in support of sanjay rathod in digras of yavatmal
silent morcha in support of sanjay rathod in digras of yavatmal

VIDEO : बंजारा समाज वनमंत्र्यांच्या पाठीशी, दिग्रसमध्ये संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मूक मोर्चा

यवतमाळ : जिल्ह्यातील दिग्रस येथे बंजारा समाजाकडून वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मूक मोर्चा काढण्यात आला आहे. संजय राठोड यांच्यावर लावण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून संपूर्ण बंजारा समाज राठोडांच्या पाठीशी असल्याचे समाजातील नेत्यांनी सांगितले.

'पूजा चव्हाण हिच्या मृत्यूचे आम्हाला दुःख आहे. आम्ही तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परंतु, यात संजय राठोड यांचे नाव जोडून त्यांना बदनाम करणे अत्यंत चुकीचे आहे. प्रत्येक महिला व तरुणींना आईबहीण अशा सन्मानाची वागणूक देणारे संजय राठोड हे असे कृत्य करूच शकत नाही. त्यांना बदनाम करण्याचे हे षडयंत्र विरोधी पक्षाने चालविले आहे. त्यामुळे संपूर्ण बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठीशी आहे. चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत संजय राठोड यांना दोषी ठरवू नये व त्यांची बदनामी तत्काळ थांबवावी. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा मागू नये अन्यथा बंजारा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही', अशी भूमिका घेत बंजारा समाज दिग्रस तालुका समनवय समिती तर्फे आज ता. १६ फेब्रुवारीला दुपारी एक वाजताच्या दरम्यान हजारो बंजारा समाज बांधवांनी संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. त्यानंतर तहसील कार्यलय येथे जाऊन तहसीलदार राजेश वजीरे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. तसेच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्याची विनंती केली. या मोर्च्यात दिग्रस तालुक्यातील जवळपास दहा हजार महिला, पुरुष व युवक सहभागी झाले होते. 

दरम्यान, पुण्यात पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली होती. तिचे संजय राठोड यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामधूनच त्या तरुणीने आत्महत्या केली असल्याचाही आरोप होत आहेत. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. तसेच याप्रकरणी काही ऑडीओ क्लीप देखील समोर आल्या आहेत. त्यावरून पोलिस चौकशी करत असून चौकशीअंती जे समोर येईल, त्यावरून कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, अद्याप संजय राठोड यांनी याप्रकरणी मौन धारण केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com