
चंद्रपूर : पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू पाहण्याची क्षमता असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील हुमन प्रकल्पाचे काम मागील ४३ वर्षांपासून काम रखडले आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी राजकीय नेतृत्वाकडून जोरकस प्रयत्न झाला नाही. यामुळे १९८२ मध्ये ३३ कोटी ६८ लाख रुपये मंजूर झाले असताना आता हा प्रकल्प ३ हजार २०० कोटींवर पोहोचला आहे. हा प्रकल्प पूर्ण न झाल्याने १६० गावांतील शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले आहे.