Sindkhed Raja Buldhana Tractor Accident : कुटार घेऊन निघाले अन् घाटातच होत्याचं नव्हतं झालं; ट्रॅक्टर उलटून दोन तरुणांचा जागीच मृत्यू!

Sindkhed Raja Road Accident : भोसा घाटातील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले; ट्रॅक्टरखाली दबल्याने दोघांचा अंत, परिसरात हळहळ
Tractor carrying cattle fodder overturns on sharp turn.

Tractor carrying cattle fodder overturns on sharp turn.

Sakal

Updated on: 

सिंदखेडराजा (बुलढाणा) : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. तालुक्यातील अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या भोसा घाटात जनावरांचे कुटार (चारा) वाहून नेणारा ट्रॅक्टर अचानक पलटी झाला. या भीषण अपघातात ट्रॅक्टरखाली दबल्याने दोन निष्पाप तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भोसा आणि वडगाव परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत असून दोन्ही गांवांवर शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...