

High Merit: 1,196 Students Secure Distinction as Taluka Maintains Academic Standards
सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील बारावी परीक्षेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत तालुक्यातील 9 महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे.तालुक्यातील 27 कनिष्ठ व 2 तांत्रिक महाविद्यालयांचा एकूण निकाल 98.09 टक्के लागला. एकूण 3 हजार 221 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी 3 हजार 196 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि 3 हजार 135 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यामध्ये 1,196 विशेष प्राविण्य, 1,454 प्रथम श्रेणी, 451 द्वितीय श्रेणी व 34 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले.