सिंदखेडराजाचे डॉ. राजेंद्र शिंगणे बनले चौथ्यांदा मंत्री

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

बुलडाणा : मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षीत विस्तार अखेर आज (ता.30) झाला. यावेळी सिंदखेडराजाचे आमदार डाॅ. राजेंद्र भास्करराव शिंगणे यांनी चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे नाव फायनल करण्यात आले. आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून 1999 ला जी पहिली विधानसभा निवडणूक झाली होती, तेव्हापासूनच पक्षात सक्रिय कार्यकर्तेच नव्हेतर बुलडाणा जिल्ह्याचे नेतृत्वही ते करत आहेत. तत्पूर्वी ते 1995 ला पहिल्यांदा अपक्ष म्हणून विजयी झाले होते. 

हेही वाचा - नववर्षाचे स्वागत थ..थ..थंडीने

पहिले राज्य व नंतर कॅबिनेट मंत्री
1999 नंतर त्यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली. त्यावेळी त्यांच्याकडे क्रीडा तथा माहिती व जनसंपर्क यासह विविध खाते होती. 2004 ला ते सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकले. नंतर त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. यावेळी त्यांच्याकडे महत्त्वाचे आरोग्य खाते सोपविण्यात आले होते. मंत्री असतांनाच राष्ट्रवादी काँग्रेसने 2008 ला त्यांना बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यावेळी त्यांचा अवघ्या 27 हजार मतांनी पराभव झाला होता. 

क्लिक करा - हवामानात बदल, शेतकऱ्यांनो पिके सांभाळा

2019 ला लोकसभेच्या रिंगणात
लगेच सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा ते सिंदखेडराजा मतदारसंघातून तब्बल चौथ्यांदा सलग विजयी झाले. त्यावेळी मात्र त्यांना मंत्रिपद मिळू शकले नाही. दरम्यान, 2014 ची लोकसभा व विधानसभा या दोन्हीही निवडणुका ते लढले नाहीत. पुन्हा पक्षाने 2019 ला त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले. 

अधिक वाचा - नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ अकोल्यात मोर्चा

विधानसभेत पाचव्यांदा विजयी
लोकसभेच्या रिंगणात त्यावेळी त्यांचा दुसऱ्यांदा पराभव झाला. लगेचच सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पाचव्यांदा निवडून येण्याचा बहुमान पटकावला. अखेर डॉ. शिंगणे यांच्या पक्षनिष्ठेचा व त्यांनी पक्षासाठी दोनदा लोकसभा निवडणुकीत उडी घेण्याच्या साहसाला शरद पवार यांनी मंत्रिपदाच्या रुपाने सन्मान केला.

‘त्या’ शपथविधीला डॉ.शिंगणे होते हजर
देवेंद्र फडणवीस व अजीत पवार यांचा जो राजभवनात शपथविधी झाला होता, त्यातून बाहेर पडून पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांना माहिती देणारे डाॅ. शिंगणे पहिले होते. पवार यांनीही त्यांना माध्यमांपुढे आणले. यापूर्वी डाॅ. शिंगणे यांनी 2001, 2004, 2008 व आता 2019 च्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाविकास आघाडीचा नवीन सत्तास्थापनेचा घडामोडी सोबतच डॉक्टर शिंगणे यांना मंत्रिपद मिळेल अशी जिल्हावासीयांना अपेक्षा होती. ती या निमित्ताने पूर्ण झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sindkhedraja mla dr. rajendra shingne becomes the fourth times minister