

Gadchiroli News
esakal
सिरोंचा: येथील सिरोंचा नगरपंचायतीच्या राजकारणात गुरुवारी (ता. २३) मोठा भूकंप झाला असून उपाध्यक्ष बबलू पाशा यांना जबर धक्का बसला आहे. नगरपंचायतीतील एकूण १७ पैकी १४ नगरसेवकांनी एकत्र येत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात अविश्वास प्रस्ताव दाखल केला.
सिरोंचा नगरपंचायतीची निवडणूक २०२१ मध्ये झाली होती. त्यात आदिवासी विद्यार्थी संघ या पक्षाचे १० तर राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे ७ नगरसेवक निवडून आले होते. नगराध्यक्षपदी फर्जना शेख या असून उपाध्यक्षपदी त्यांचे भाऊ बबलू पाशा आहेत.