esakal | दोघींनी केली बहिणीच्या प्रियकराची "धुलाई'
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दोघींनी केली बहिणीच्या प्रियकराची "धुलाई'

sakal_logo
By
ok

नागपूर : प्रेयसीला भेटायला घरी आलेल्या प्रियकराची दोघ्या बहिणींनी येथेच्छ धुलाई केली. त्यानंतर त्याला धंतोली पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली आहे. रोशन मंडपे (वय 18, रा. फकिरावाडी) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धंतोलीत राहणारी 18 वर्षीय युवती आयटीआयचे शिक्षण घेते. तिची फकिरावाडीत राहणाऱ्या रोशनशी ओळख झाली. ओळखीनंतर दोघांची मैत्री झाली. दोघांच्या भेटीगाठी वाढल्याने संबंध पुढे गेले. रोशनने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यामुळे ती कॉलेजला न जाता नियमित रोशनसोबत फिरायला जात होती. हा प्रकार तिच्या दोन बहिणींच्या लक्षात आला. त्यांनी आईच्या कानावर ही बाब टाकली. आई आणि बहिणींनी रोशनची समजूत घालून मुलीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. तसेच मुलीला नातेवाईकाकडे पाठवून दिले. मात्र, ती परत येताच पुन्हा दोघांचे प्रेमसंबंध वाढले. मंगळवारी सायंकाळी रोशन प्रेयसीला भेटायला तिच्या घरी आला. त्यावेळी घरी कुणीही नव्हते. मात्र, तासाभरानंतर तिच्या दोन्ही बहिणी घरी आल्या. त्यांना रोशन घरात दिसला. दोघींनीही रोशनला चांगलाच चोप दिला तसेच पोलिसांना माहिती दिली. धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून रोशनला अटक केली.

loading image
go to top