Truck Accident: ट्रक ऑटोच्या भीषण अपघातात सहा ठार, राजुरा गडचांदूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना
Accident News: राजुरा-गडचांदूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि ऑटोच्या धडकेत सहा जण ठार झाले. दोन जखमींची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राजुरा : राजुरा-गडचांदूर राष्ट्रीय महामार्गावरील कापणगावजवळ ट्रक आणि ऑटोची समोरासमोर झालेल्या धडकेत सहा जण ठार झाले. या भीषण अपघातात ऑटो अक्षरशः चक्काचूर झाला.