esakal | काटोलमध्ये सहा साठवण तलावास मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहीत

काटोलमध्ये सहा साठवण तलावास मंजुरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काटोल (जि. नागपूर) : काटोल विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या 6 कोटी 80 लाखांच्या सात योजनांना राज्य मत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.
गत वर्षी काटोल मतदारसंघातील काटोल व नरखेड या दोन्ही तालुक्‍यात भिषण दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. अशातच आमदार नसल्याने मतदारसंघ वाऱ्यावर होता. स्थानिक नेत्यांनी वरीष्ठ पातळीवर दुष्काळ निवारणासाठी सरकारकडे आवाहन केले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काटोल मतदारसंघात विशेष लक्ष घालून अनेक योजनांची मंजुरी दिली. यातच नव्याने शुन्य ते शंभर व शुन्य ते अडीचशे हेक्‍टर सिंचनासाठी मतदारसंघात सहा साठवण तलाव व एक कोल्हापुरी बंधारा मंजूर केला आहे. राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने प्रशासकीय मान्यतेचे पत्र पाठविले आहे.
सहा साठवण तलावात सिर्सावाडी डोंगरगाव साठवण तलावासाठी 1 कोटी रुपये, वडेगाव उमरी साठवण तलावासाठी 75 लाख, मोहदी दळवी पळसगाव रिठी साठवण तलावासाठी 75 लाख, पांढरी (खाडपेठ) साठवण तलावासाठी 65 लाख, सारडी पिठोरी साठवण तलावासाठी 65 लाख, हिवरमठ साठवण तलावाच्या निर्मितीसाठी 1 कोटी 50 लाख रुपये व लोहरी सांवगा कोल्हपुरी बंधाऱ्यासाठी 1 कोटी 50 लाख रुपये असे एकूण सहा कोटी 80लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा त्याची झळ पोहचणार नाही, यासाठी साठवण तलाव तयार करण्याचा निर्णय घेतल्याने दिलासा मिळणार आहे. यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रयत्न केले, त्याचे काटोल मतदारसंघातील जनतेच्यावतीने आभार.
- संदीप सरोदे, माजी सभापती, पंस. काटोल.

loading image
go to top