esakal | साडेसहा हजार तुकड्यांची तपासणी रखडली
sakal

बोलून बातमी शोधा

साडेसहा हजार तुकड्यांची तपासणी रखडली

साडेसहा हजार तुकड्यांची तपासणी रखडली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यात विनाअनुदानित तत्त्वावर 2012 साली पाच हजार 973 तुकड्यांना मान्यता देण्यात आली. यानंतर 635 अतिरिक्त व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांचा त्यात समावेश केला. मात्र, या तुकड्यांची शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणीच करण्यात आली नसल्याने तुकड्यांवर नेमलेल्या शिक्षकांच्या वेतन अनुदानाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
शिक्षण विभागाकडून दिलेल्या तुकड्यांमधील विद्यार्थी पटसंख्या, उपलब्ध वर्गखोल्यांची माहिती, शिक्षकांची वैयक्तिक मान्यता या मुद्द्यांच्या आधारावर मूल्यांकन व तपासणी करून मान्यता देणे आवश्‍यक होते. त्यासाठी शिक्षण संचालकांनी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह उपसंचालकांकडे जबाबदारी दिली होती. मात्र, राज्यातील अधिकाऱ्यांनी या तुकड्यांची तपासणीच केली नाही. या तुकड्यांची यादीच सरकारकडे सादर करता आलेली नाही. यामुळे एकूण सहा हजार 608 तुकड्यांवर नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या वेतन अनुदानाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून या प्रकरणी जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात येत असल्याने शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

loading image
go to top