वाडी - सहा वर्षांचा चिमुकला घराबाहेर खेळत असताना मोकाट श्वानांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ही घटना दत्तवाडी, सुरक्षानगर येथे घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्वप्नील मसराम (६, रा. सुरक्षानगर दत्तवाडी) असे जखमी मुलाचे नाव आहे.