esakal | देवलापार हद्दीत साठ टन सुपारी पकडली 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

देवलापार हद्दीत साठ टन सुपारी पकडली 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देवलापार (जि.नागपूर): शुक्रवारी (ता. 23) दुपारी बाराच्या सुमारस देवलापार हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील बोथिया पालोरा गेटसमोर पोलिसांनी नाकाबंदी केली असता दोन ट्रकमधून एकूण 60 टन सुपारी, किंमत 97 लाख 65 हजार रुपये व तीन चारचाकी वाहने जप्त करण्यात आलीत. सुपारी मालाच्या मालकी हक्काबाबत दावा करण्यास सामोरे न आल्याने दोन्ही ट्रकमधील सुपारी ही चोरीची असल्याचा दाट संशय आल्याने दोन पंचांसमोर घटनास्थळी जप्ती पंचनामा कार्यवाही पूर्ण करण्यात आली. त्यावरून पोलिस ठाणे देवलापार येथे गुन्हा नोंदविण्यात आला. एकूण 1 कोटी 57 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नंदराम माखन आदिवासी (वय 25, चौकी, म.प्र.), कमलेश बिरनलाल प्रजापती (वय 35, खापरखेडा, म. प्र.)अशी अटक करण्यात आलेल्या वाहनचालकांची नावे आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा (ग्रा), अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार, यांच्या आदेशाने पोलिस उपनिरिक्षक जावेद शेख, सचिन मत्ते, पोहवा संतोष पंधरे, पोहवा रमेश भौयर, पोहवा मदन आसटकर, पोलिस शिपाई बालाजी साखरे, पोशि सतीश राठोड, अमोल वाघ, चालक साहेबराव बहाळे यांच्या पथकाने पार पाडली.

loading image
go to top