प्रश्न पोटाचा! हातगाडीसाठी गरीब व्यावसायिक चक्क शासकीय वाहनासमोर झोपला

प्रश्न पोटाचा! हातगाडीसाठी गरीब व्यावसायिक चक्क शासकीय वाहनासमोर झोपला

यवतमाळ : कोरोनामुळे (coronavirus) अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. सद्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) अधिकच हाल होत आहेत. रोज कमावून खाणाऱ्याची स्थिती खूपच बेकार झाली आहे. तरीही काही दुकानदार, हातगाडीवाले दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान सुरू ठेवतात (Small business) आणि दोन पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशा दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. याला सोशल मीडियावर कळाळून विरोध (Opposition on social media) होत आहे. असाच एक प्रकार यवतमाळ शहरात घडला. (small businessman Sleep in front of a government vehicle for a business vehicle)

राज्य सरकारने १ जूनपर्यंत लॉकडाउन घोषित केला होता. मात्र, रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतरही १५ जूनपर्यंत यात वाढ केली आहे. लॉकडाउनमुळे व्यावसायिक चांगलेच हताश झाले आहेत. तसेच लहान व्यावसायिकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. ते लॉकडाउनमध्ये काही दिवस दुकान सुरू ठेवण्याची मागणी करीत आहे. मात्र, त्यांना सूट मिळालेली नाही.

प्रश्न पोटाचा! हातगाडीसाठी गरीब व्यावसायिक चक्क शासकीय वाहनासमोर झोपला
यवतमाळात सैराट पार्ट २ : प्रेमीयुगलावर मुलीच्या वडिलांनी केला प्राणघातक हल्ला

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील असाच एक लहान व्यावसायिक हातठेल्यावर मास्क विक्री करीत होता. ते मास्कसोबतच स्टेशनरीचे लहानसहान साहित्यही विकत होता. ही बाब नगर पालिका कर्मचाऱ्यांना साजताच त्यांनी हातगाडी चालकावर कारवाई केली. लॉकडाउनच्या काळात मास्क व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य विक्रीवर निर्बंध असल्याचे कर्मचाऱ्यांनी हातगाडीवाल्याला समजावून सांगितले. मात्र, तो हातगाडीचालक कर्मचाऱ्यांचे काहीही ऐकण्यास तयार नव्हता.

तरी नगर पालिका कर्मचाऱ्यांना त्याची हातगाडी तहसील कार्यालयात जमा केली. कारवाईने संतप्त झालेला हातगाडी चालक चक्क शासकीय वाहनासमोर झोपला. घटनास्थळी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. काही नागरिकांनी याचा व्हिडिओही काढला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शासनाचा आदेश पाळून कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे बरोबर आहे. परंतु, पोटाची आग शमविण्यासाठी कष्टाने व्यवसाय करणाऱ्यांचीही काय चूक, असा प्रश्न नेटकरी विचारात आहे.

प्रश्न पोटाचा! हातगाडीसाठी गरीब व्यावसायिक चक्क शासकीय वाहनासमोर झोपला
सायकलवर समोसे विकत ओढते संसाराचा गाडा; मातेचा मुलांसाठी संघर्ष

व्यावसायिकांची काय चूक?

लॉकडाउनमुळे अनेकांचा व्यवसाय बुडाला आहे. काही ठिकाणी ११ पर्यंत तर कुठे दुकान उघडण्याचीच परवानगी दिलेली नाही. यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोज खायला मिळावे यासाठी काही छोटे व्यावसायिक आपला व्यवसाय चालवत आहे. मात्र, अशा गरीब व्यावसायिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. कारवाई बरोबर असली तरी व्यावसायिकांची चूक काय, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.

(small businessman Sleep in front of a government vehicle for a business vehicle)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com