अल्पभुधारक शेतकरीपुत्र गणेश पोरटे झाला पॅराकमांडो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh porate

चंद्रमोडी झोपडीत राहून मिळेल ते काम करायच, अनं आपल्या कुटुंबाचं रहाटगाडग चालवायच. अशा गरीब अल्पभुधारक शेतकरी कुटुंबात सध्या अतिशय आनंदाच वातावरण आहे.

अल्पभुधारक शेतकरीपुत्र गणेश पोरटे झाला पॅराकमांडो

गोंडपिपरी - चंद्रमोडी झोपडीत राहून मिळेल ते काम करायच, अनं आपल्या कुटुंबाचं रहाटगाडग चालवायच. अशा गरीब अल्पभुधारक शेतकरी कुटुंबात सध्या अतिशय आनंदाच वातावरण आहे. कारण त्यांचा मुलगा आता पॅराकमांडो झालाय. तब्बल विस हजार सैनिकातून केवळ चार सैनीकांची यासाठी निवड करण्यात आली. यात अल्पभुधारक शेतकरीपुत्राचा समावेश आहे. गणेश पोरटे असे या तरूणाचे नाव आहे. तो चंद्रपूर जिल्हयातील गोंडपिपरी तालुक्यातील वटराणा गावचा रहिवाशी आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील वटराणा हे आदिवासी बहुल गाव. अनेकांकडे असलेली तुटपुंजी शेती व शेतमजूरी हेच त्यांच्या जिवनमानाचा साधन. गणेश पोरटे हा तरूण अशाच एका अल्पभुधारक शेत मजूरी कुंटुबातील तरूण. गणेशच बारावीपर्यतच शिक्षण गोंडपिपरींच्या जनता विद्यालयात झाल. घरची परिस्थीती बघता स्वत काम करून त्यानं शिक्षण घेतल.

देशसेवेचा ध्यास घेत त्याने आर्मीत जाण्याचा निर्णय घेतला. दोनदा अपयश आल. पण न खचता त्याने प्रयत्न सुरू ठेवले, अनं शेवटी त्याला यश मिळाल. पुलवामा येथे रणगाडा पथकात तो दाखल झाला. आर्मीत निवड झालेल्या सैनिकांना विशेष प्रशिक्षण घेउन पॅराकमांडोचा दर्जा मिळत असतो. पण त्यासाठी अतिशय खरतळ प्रशिक्षण ध्यावे लागते. यावर्षी तंगधर, कुपवाडा, काश्मीर येथे विस हजार सैनीक पॅराकमांडोच्या प्रशिक्षणासाठी दाखल झाले. या विस हजार सैनिकांपैकी केवळ चार सैनिकांनी हे प्रशिक्षण यशश्वीरित्या पुर्ण केले. यात गणेश पोरटे यांचा देखिल समावेश आहे.

पॅराकमांडोचे प्रशिक्षण हे अतिशय खडतळ असते. 90 दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात विविध कठीण टप्पे पार पाडावे लागतात. 36 तासात 17 किलोचे वजन घेउन 100 किलोमीटरचे अंतर गाठावे लागते. सोबत 10 हजार स्क्ेअर फुटावरून उडी मारणे, जंगलात रांत्रदिवस वास्तव करणे, यासह अतिशय कठीण परिस्थीतीत हे प्रशिक्षण पुर्ण दिल्या जाते. पॅराकमांडोच प्रशिक्षण हे सर्वात कठीण प्रशिक्षण मानले जाते. यात शारिरीक क्षमतेसोबत मानसिक क्षमतेची पराकोटीची कसोटी लागते. गणेशने हे प्रशिक्षण यशश्वीरित्या पुर्ण केले.

पॅराकमांडो झाल्यांनतर त्यांना मरीन कॅप दिली जाते. सोबत स्पेशल फोर्स मध्ये त्यांचा समावेश होतो. वटराणा सारख्या आदिवासीबहूल गावातील गणेशने अतिशय संघर्ष करून मिळविलेल्या यशाची माहिती होताच अनेक मित्रमंडळीनी प्रचंड आनंद व्यक्त केला. कधी काळी बांधकामाच्या कामावर जाणारा तरूण आर्मीत गेला. अनं तिथेन त्यांन आपल्या बुध्दीमतेची ताकत दाखवित पॅराकमांडो होण्याचा मान मिळविला. हि अतीशय गर्वाची असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

गणेशच्या वाटचालीत त्याचा मावसभाउ प्रशांत भोयर व भाउजी कांताजी खेडकर यांची मोलाची साथ मिळाली. पॅराकमांडो होणे अतिशय कठीण असतांना गोंडपिपरी तालुक्यातील एका तरूणाने हि कामगीरी फत्ते केली. याची माहिती कळताच अनेकांनी गणेशबाबत गौरोददार काढले आहेत. ध्येयाची वाटचाल, सातत्यपुर्ण प्रयत्न, प्रचंड परिश्रम अनं संयम ठेवला कि कुठलही यश गाठता येते हे गणेश दाखवून दिल आहे. त्याची हि वाटचाल अनेकांसाठी आदर्शव्रत ठरणारी आहे.