30 हजार सवलतधारकांना स्मार्टकार्ड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

अमरावती : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीतून प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना 1 जानेवारी 2020 पासून स्मार्टकार्ड बंधनकारक होणार आहे. त्यामुळे 31 डिसेंबर 2019 पूर्वी सवलतधारकांना आपले स्मार्टकार्ड बनून घ्यावे लागणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 60 हजार सवलतधारकांनी अर्ज केले असून 30 हजार लोकांना स्मार्टकार्डचे वाटपही पूर्ण झाले आहे.

स्मार्टकार्डसाठी सवलतधारकांना आपले आधारकार्ड, पासपोर्ट फोटो आणि मोबाईल क्रमांक अनिवार्य आहे. मोबाईल क्रमांकावर ओटीपी (वन टाईम पासवर्ड) येत असल्यामुळे नोंदणीकर्त्याला सोबतच मोबाईल घेऊन जावे लागणार आहे. आगारासोबतच सवलतधारकांना महामंडळाच्या आठ आगाराच्या परिक्षेत्रात येणाऱ्या 46 केंद्रांवरून स्मार्टकार्डची सुविधा उपलब्ध आहे. सवलतधारकाला त्या त्या आगारात जाऊन केंद्राची माहिती घ्यावी लागेल. आतापर्यंत 30 हजार सवलतधारकांना स्मार्टकार्ड देण्यात आले, उर्वरितांना कार्ड वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले.

46 केंद्रे कार्यरत
जिल्ह्यातील आठ आगारांव्यतिरिक्त 46 केंद्रे कार्यरत आहेत. अमरावती आगारात 5, बडनेऱ्यात 3, भातकुलीत 1, चांदूरबाजारात 11, चांदूररेल्वेत 3, दर्यापुरात 6, मोर्शीत 2, परतवाडा येथे 10 व वरुडात 5 केंद्रांवरून स्मार्टकार्ड काढता येईल.

स्मार्टकार्ड बनविणे गरजेचे
1 जानेवारीपासून सर्वच सवलतधारकांना स्मार्डकार्ड बंधनकारक होणार आहे. त्यामुळेच 31 डिसेंबरपर्यंत ही सुविधा देण्यात आली आहे. सवलतधारकांनी आपल्या नजीकच्या केंद्रावर जाऊन तातडीने आपले स्मार्टकार्ड बनून घ्यावे. 1 जानेवारीनंतर स्मार्डकार्डशिवाय सवलतधारकाला प्रवास करता येणार नाही, असे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart card for up to 30 thousand discounters