
केळवद (ता.सावनेर) : कोणतीही पूर्वसूचना न देता केळवद येथे महावितरणकडून घरगुती स्मार्ट वीज मीटर बसवण्यात आले. त्यानंतर आलेल्या बिलामध्ये अचानक मोठी वाढ झाल्याने वीज ग्राहक संतप्त झाले असून, गुरुवारी(ता. १७) शेकडो नागरिकांनी महावितरणच्या वीज उपकेंद्रावर धडक देत जोरदार घेराव घातला. ‘स्मार्ट मीटर काढा, वाढीव बिल कमी करा’, अशी मागणी करीत नागरिकांनी कार्यालयात गोंधळ घातला.