आई-वडिलांच्या भेटीने फुलले चिमुकलीच्या चेहऱ्यावर हास्य

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांची ताटातूट झाली. कामगार घरी जाण्यासाठी आतूर झाले आहेत. अशातच 24 मार्चपासून मेडशी येथे अडकलेली एक चिमुकली 41 दिवसानंतर आई-वडिलांना भेटली.

अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांची ताटातूट झाली. कामगार घरी जाण्यासाठी आतूर झाले आहेत. अशातच 24 मार्चपासून मेडशी येथे अडकलेली एक चिमुकली 41 दिवसानंतर आई-वडिलांना भेटली. तिला घरी पोहोचून देणाऱ्या आरोग्य दुतांचे आभार मानताना आई-वडिलांना गहिवरून आले होते.

 

देशासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे २४ मार्चपासून लॉकडाउन करण्यात आले. जिल्हाबंदी झाल्याने जिल्ह्या-जिल्ह्याच्या सीमा सिल करण्यात आल्यात. लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले. या परिस्थितीत मोठी उमरी, अकोला येथील एक चिमुकली कु. दीप श्याम मिश्रा ही 24 मार्चपासून मेडशी येथे अडकली होती. प्राथमिक केंद्र वाशीम येथे ज्येष्ठ परिचारीका म्हणून कार्यरत असलेल्या आपल्या आजीकडे ती होती तर आई-वडिल अकोल्यात. अशा परिस्थितीत अडकल्या एकीकडे आई-वडिलांच्या भेटीची ओढ लागलेली दीप तर दुसरीकडे मुलगी लांब असल्याने आई-वडिलांची होणारी घालमेल बघविणारी नव्हती. रुग्ण सेवेत असलेली आजी प्राथमिक आरोग्य केंद्र सोडून कुठे जाऊ शगत नव्हती. या परिस्थिती त्यांनीग चिमुकल्या दीपला सांभाळले. अखेर तब्बल 41 दिवसांनी चिमुकलीला तिच्या आई-वडिलांना भेटण्याचा योग आल् आणि ती सुखरूप घरी पोहोचली तेव्हा आई-वडिलांचा जीवही भांड्यात पडला.

 

आरोग्य दुतांनी पोहोचविले घरी
राज्यसरकारने परवानगी दिल्यामुळे मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत करवते यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने चालक सहदेव तायडे यांच्या सहकार्याने चिमुकलीला अकोला येथे आई सौ. पुनम मिश्रा व वडील श्याम मिश्रा यांच्यापर्यंत पोचविले. दीपला आपल्या डोळ्यासमोर पाहुन आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पुनम मिश्रा व श्याम मिश्रा यांनी मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी व संपूर्ण कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानाले. कोराना सारख्या भयंकर रोगाचा थेट सामना करताना अशी मानवता निभावणाऱ्या मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत करवते व सर्व सहकारी यांनी देवदुताचे काम केल्याच्या भावना दीपच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्यात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A smile on baby face as he visited after 41 days his parents