सापांचा हैदोस, मग खेळायचे कुठे? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

नरखेड (जि.नागपूर) स्थानिक पालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात गवत व झाडेझुडपे वाढल्यामुळे विषारी सापांचा हैदोस वाढला आहे. तर सलगचे काही गाळे कुलूपबंद आहेत. त्यामुळे लहान मुलांच्या जीविताला तर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. 

नरखेड (जि.नागपूर) स्थानिक पालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात गवत व झाडेझुडपे वाढल्यामुळे विषारी सापांचा हैदोस वाढला आहे. तर सलगचे काही गाळे कुलूपबंद आहेत. त्यामुळे लहान मुलांच्या जीविताला तर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. 
याप्रकरणी नगरसेवक सुधाकर ढोके यांनी लेखी तक्रार मुख्याधिकारी यांना दिली आहे. मात्र त्याकडे लक्ष देण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे वेळ नसल्याचा आरोप लावण्यात येत आहे. एकेकाळी नागपूर जिल्ह्यात सर्वत्र सिमेंट बंदी असल्यामुळे स्थानिक दलित व आंबेडकर निष्ठावंतांनी जीवाची पर्वा न करता मध्यप्रदेशातून डोक्‍यावर व मिळेल त्या वाहनानिशी सिमेंट आणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नरखेडच्या शिल्पकारांच्या हस्ते पुतळा उभारला.  परंतु अलीकडे अतिवृष्टीमुळे सदर उद्यानात जागोजागी झाडेझुडपे व गवत वाढलेले दिसते. शिवाय मंदाकिनी नदीला आलेल्या अनेक पुरांमधून वाहत आलेल्या विषारी सापांची वर्दळ सदर आंबेडकर उद्यानात वाढल्याने लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. कारण उद्यानात लहान मुलांपयोगी खेळणी व अभ्यासिका उपलब्ध आहे. तर सलगच्या गाळ्यांना मुतारीचे स्वरूप आले आहे. भाड्याने दिलेल्या एका गाळ्यात जंतुनाशके व खते ठेवल्यामुळे त्याचा उग्र दर्प सर्वत्र पसरला असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यावरून पालिका स्वच्छता, सफाई व आरोग्य समितीचेच आरोग्य बिघडले काय, असा सवाल सर्वत्र उठत आहे हे उल्लेखनीय.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Snake Hidos, then where to play?