अमरावती - सोशल मीडियावर एका युवतीसोबत तिघांचे चॅटिंग सुरू असल्यामुळे झालेल्या वादातून युवकाची हत्या करण्यात आली. बुधवारी (ता. १५) सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास ही घटना राजेंद्र कॉलनी परिसरात घडली. .शेख अफाक शेख अकील (वय-२४, रा. ताजनगर, अमरावती), असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती पोलिस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी दिली. सदर घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालय व शेवागारासमोर शेकडोंची गर्दी जमल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. हल्लेखोरांमध्ये एका युवकासह तीन विधिसंघर्षित बालकांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले..तक्रारकर्ता, अन्य विधिसंघर्षित व काही युवक यांचा सोशल मीडियावर एक ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये काही महाविद्यालयीन युवतींसह युवकांचाही समावेश आहे. त्याच ग्रुपमध्ये शेख अफाक सुद्धा होता. सोशल मीडियावर असलेल्या ग्रुपमधील एक महाविद्यालयीन मुलगी ही एका युवकाची मैत्रीण होती. त्या मुलीसोबत ग्रुपमधील एक विधिसंघर्षित मुलगा व शेख अफाक हे सुद्धा चॅटिंग करीत होते..मुलीच्या मित्राने विधिसंघर्षित बालकाला मैत्रिणीसोबत चॅटिंग करू नको, असे म्हटले. या मुद्द्यावरून काही युवकांमध्ये वाद सुरू होता. हा वाद मिटावा म्हणून शेख अफाक हा दोन विधिसंघर्षित मुलांना सोबत घेऊन भेटून वाद मिटविण्यासाठी प्रशांतनगर मार्गावर गेला. सेटलमेंट होण्याऐवजी मुलांच्या दोन गटांत वाद वाढला.ज्यांनी सेटलमेंटसाठी बोलविले होते त्या दोघांनी फोन करून आपल्या अन्य दोन सहकाऱ्यांना राजेंद्र कॉलनी मार्गावर बोलावून घेतले. त्यापैकी एकाने पाठीमागे लपवून आणलेला कोयता काढून त्या कोयत्याने शेख अफाक याच्यावर सपासप वार केले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याच्यासोबत असलेले सहकारी घटनास्थळावरून झटापट झाल्यानंतर पळाले..हाताचा पंजा मनगटापासून वेगळाहल्लेखोरांनी धारदार कोयत्याने वार केल्यानंतर जखमी स्थितीत शेख अफाक याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा पाठलाग करून त्याच्या पोटावर व मानेवर वार केले. त्याच्या हाताचा पंजा मनगटापासून वेगळा केला. मनगटापासून वेगळा झालेला हात बराच वेळ घटनास्थळी पडून होता..दोन मुलींचीही पोलिसांकडून चौकशीसोशल मीडियावरील ग्रुपमधील ज्या मुलीसोबत चॅटिंग सुरू होती, त्या मुलीसह अन्य एक मुलगी, अशा दोघींना चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये पोलिसांनी बोलविले होते. हत्येनंतर मुलींचेही बयाण नोंदविण्यात आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.