संग्रामपूर - ताटात अन्न शिल्लक ठेवले म्हणून पोटच्या मुलाने बापाला संपवले. ही हृदयदायक घटना संग्रामपूर तालुक्यातील बोडखा गावात 13 आगस्ट रोजी घडली. तब्ब्ल सात दिवसानंतर सुनेने फिर्याद दिल्यावर मुलगा आणि नातवा विरुद्ध तामगावं पोलिसांनी 19 आगस्ट रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला.
दोन्ही आरोपीताना ताब्यात घेऊन पाच दिवसाचा पीसीआर घेण्यात आला. या गावातील ही अशी पहिलीच घटना असल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे. मृतक हे ग्रामपंचायतचे उपसरपंच होते हे विशेष!